Ad will apear here
Next
‘आर्ट पुणे’च्या वतीने ‘शून्य घर’ चित्रपटाचे स्क्रीनिंग
 
पुणे : ‘गायन, वादन, नृत्य या कलांसाठी पुणे शहर हे जगात आपली ओळख बनवून आहे. मात्र असे असले तरी अद्यापही व्हिज्युअल आर्टसाठी या शहरात काही भरीव होताना दिसून येत नाही. या क्षेत्रात भरीव काम करायचे झाल्यास शहरातील कलाकार आणि कलाप्रेमींनी एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध कलाकार आणि कोची मुजरिस बिनालेचे माजी क्युरेटर सुदर्शन शेट्टी यांनी व्यक्त केले.
 
कलाकार आणि कलेविषयी आस्था असलेल्या समविचारी नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘आर्ट पुणे’ या संस्थेच्या वतीने शेट्टी यांच्या ‘शून्य घर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक डॉ. प्रकाश मगदूम यांबरोबर आर्ट पुणेचे राजू सुतार, वैशाली ओक, संजीव पवार, प्रियंवदा पवार, मंगेश लोहपात्रे, शोभना हडप, मेहुल शाह, विशाल कटारिया,
आदी या वेळी उपस्थित होते.
 
या वेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘कोची, चेन्नई या शहरांचा विचार केला तर या ठिकाणी शहरातील कलाकृती या त्या त्या ठिकाणच्या इतिहासातून आल्या आहेत. याबरोबरच बाहेरील गोष्टींचा प्रभावही यावर झालेला पहायला मिळतो. पुण्याचा विचार केला तर या शहराकडे स्वत:च्या अनेक गोष्टी आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या हे शहर पुढारलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिज्युअल आर्ट चा प्रसार होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे’.
 
‘शून्य घर’ हा चित्रपट १२ व्या शतकातील प्रसिद्ध कवी आणि संत गोरक्षनाथ यांच्या असून ‘शून्य गढ शहर, शहर घर बस्ती’ या दोह्यावर आधारित असून यामध्ये व्यक्तीचित्रांबरोबरच शिल्पे, संगीत यांसारख्या अनेकविध कलांच्या एकत्रीकरण करून अपेक्षित तो अर्थ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदर्शन शेट्टी हे स्वत: नावाजलेले कलाकार असून पेंटिंग, शिल्प, व्हिडिओ, इंस्टॉलेशन यांबरोबरच अनेक कलांमध्ये त्यांचा हातखंड आहे. राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांची आणि त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTIBH
Similar Posts
फ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी पुणे : पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ या लघुपट महोत्सवात पुणेकर चित्रपट रसिकांना समीक्षकांनी गौरविलेले फ्रान्स व जर्मनी या देशांमधील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कर्टन रेझर अर्थात पूर्वपीठिका म्हणून या महोत्सवाचे
ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
जल साक्षरतेसाठी ‘नीर ध्वनी’महोत्सवाचे आयोजन पुणे : पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. या पाण्याचे संवर्धन अथवा व्यवस्थापनाचा कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी पाण्याशी संबंधित अनेक पैलू समजून घेणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेत, जलस्रोताची बचत करताना जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर, तलेरा इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट्स आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language